समाजाचे आपण देणे लागतो" या उदात्त भावनेतून प्रेरित होऊन कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यात कोरोनाग्रस्तांचे अंतिम संस्कार, शाळा- कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी "आपली सुरक्षा, आपली जबाबदारी" यासारखे जनजागृती उपक्रम, लैंगिक शिक्षण, सायबर गुन्हे याविषयी मार्गदर्शन, आदिवासी व अनिवासी (विटभट्टीतील कामगारांच्या मुलांसाठी ) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आले.
याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी सिडबॉल वितरण, वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांद्वारे निसर्गरक्षणालाही हातभार लावण्यात आला. या सामाजिक कार्यातूनच महिलांचे प्रश्न, त्यांच्या सक्षमीकरणाची गरज आणि जनकल्याणाच्या दृष्टीने 'अश्वपरीस फाउंडेशन' ची स्थापना झाली. ही संस्था शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक व कौटुंबिक समस्यांवर उपाय शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
तसेच " टाटा स्टील फाऊंडेशन" च्या सहयोगाने आदिवासी बांधवांच्या वाडीत जाऊन जातीचे दाखले काढून देण्याचे काम व आदिवासीना शासनाच्या विविध सेवा व सवलतींचा लाभ मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे.
समान हक्क, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजात पोहोचवणे प्रत्येक घटकाला स्वावलंबी बनवून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आणणे.
सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक ऋण लक्षात ठेवून, हे कार्य अधिक व्यापक पातळीवर आणि सातत्याने समाजासाठी पुढे नेण्याची संस्थेची मनोमन इच्छा आहे.